शेतकऱ्यांकडून 8 डिसेंबरला भारतबंद

शेतकऱ्यांकडून 8 डिसेंबरला भारतबंद

 

नव्या कृषी कायद्याच्या निमित्ताने आंदोलन रेटून नेण्याचा प्रयत्न करणारे केंद्र सरकार आता थोडीशी नमती भूमिका घेऊ लागले आहे. पण नवीन कृषी कायद्यात आम्हाला दुरूस्ती अपेक्षित नाही. तर संपुर्ण कायद्यातच बदल करणे अपेक्षित आहे. म्हणूनच जनविरोधी अशा शेतकरी कायद्यावर सरकारसोबतच्या बैठकीत आम्ही आमची संपुर्ण नाराजी व्यक्त करणार आहोत. येत्या ८ डिसेंबरला शेतकऱ्यांकडून भारतबंद ठेवण्यात येणार असल्याची घोषणा शेतकरी संघटनांनी आज पत्रकार परिषद घेऊन केली. कृषी कायद्यातील दुरूस्ती म्हणजे केंद्र सरकारला जुमला आहे, पण शेतकऱ्यांसोबतची गद्दारी विसरली जाणार नाही असेही ते म्हणाले.

संपुर्ण देशभरात आंदोलन पुढे चालवण्यात येणार आहे. देशाभरातील अनेक राज्यांमधून आता शेतकरी संघटना या आंदोलनाशी जोडल्या जात आहेत. त्यामध्ये कर्नाटक, बंगाल, आसाम, ओरिसा, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब अशी अनेक राज्ये सध्या आंदोलनाशी जोडले जात आहेत. पण नव्या कृषी कायद्यातील घटना दुरूस्ती करून काही होणार नाही. जनविरोधी असा कायदा संपुर्णपणे बदण्यात यायला हवा. शेतकऱ्यांविरोधातील तिनही कायदे मागे घ्यायला हवेत अशी मागणी शेतकरी संघटनांकडून लावून धरण्यात येत आहे. सरकार बैठकीसाठी बोलवणार तेव्हा या कायद्याला कडाडून विरोध करणार असल्याचे शेतकरी संघटनांकडून स्पष्ट करण्यात आले. शेतकऱ्यांकडून येत्या दिवसात कर्नाटकात विधानभवनासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल. तर बंगालमध्ये रास्तारोको करण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्र, बिहार, आसाम, ओरिसा, उत्तर प्रदेश, बिहार आणि पंजाब यासारख्या राज्यातूनही आंदोलनासाठी साथ मिळू लागली आहे. संपुर्ण हिंदुस्तान आता लढाईत उतरल आहे. तसेच सरकारही शेतकऱ्यांसमोर झुकू लागले आहे. शेतकऱ्यांना आंदोलन करण्यापासून रोखण्यात आले, त्यानंतर आंदोलन करण्यासाठी दुसरीकडे जाण्यासाठी सांगितले आणि आता सरकार चर्चेसाठी बोलवू सागले आहे. याआधीच्या बैठकीतही पुर्ण म्हणणे सरकार एकत आहे, त्याआधी अटींसह चर्चा करण्याची बाब सरकारने स्पष्ट केली होती.

शेतकरी संघटनांकडून प्रत्येक राज्यात आंदोलन होणार आहे. तर ८ तारखेला देशव्यापी संपाची हाक देण्यात आली आहे. चर्चा करून काहीही होणार, शेतकरी कायद्यात दुरूस्त्यांसाठी मंजुर देण्यात येणार नाही असा पवित्रा शेतकरी संघटनांनी घेतला आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या लढाईची स्फुर्ती देशातील शेतकरी घेत आहेत. म्हणूनच येत्या दिवसांमध्ये भारत बंद होणार आहे. शहरातील लोक शेतकरी आंदोलनाकडे गांभीर्याने पाहत नसतात, पण हा संघर्ष पाहतात त्यांचा समावेश करून घेण्यासाठी हैद्राबाद येथे सायकल रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. देशात शेतकऱ्यांची संघर्षाची लढाई सुरू असतानाच, सरकार मात्र फोडा आणि राज्य करा अशीच रणनिती वापरत असल्याची टीका शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींकडून करण्यात आली.

अभिप्राय द्या..