शिवराजेश्वर मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा उत्सवानिमित्त दीपोत्सव साजरा..

शिवराजेश्वर मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा उत्सवानिमित्त दीपोत्सव साजरा..

मालवण /-

मालवण समुद्रातील ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गमधील शिवराजेश्वर मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा उत्सवानिमित्त दीपोत्सव साजरा करण्यात आला. अनेक दिव्यांच्या प्रकाशात शिवराजेश्वर मंदिर उजळून निघाले होते.

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त किल्ले सिंधुदुर्गमधील शिवराजेश्वर मंदिरात किल्ला रहिवाशांनी आकर्षक पद्धतीने दिव्यांची आरास केली होती. तर गाभाऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती समोरही दिव्यांची आरास करण्यात आली. दिव्यांच्या प्रकाशात मंदिराचा सभामंडप व मंदिर परिसर उजळून निघाला. या उत्सवात पुजारी श्रीराम सकपाळ, मंगेश सावंत व किल्ला रहिवासी सहभागी झाले होते.

अभिप्राय द्या..