मालवण /
भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सिंधुदुर्ग यांच्या वतीने रविवार दिनांक ६ डिसेंबर ,२०२०रोजी सकाळी ठिक ११ वाजता महापरिनिर्वाण बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनाचा मुख्य कार्यक्रम डॉ बाबासाहेब आंबेडकर जिल्हा भवन कणकवली येथे संपन्न होणार आहे यामध्ये जिल्ह्यातील सर्व केंद्रीय शिक्षक बौद्धाचार्य उपासक उपासिका व सैनिक यांनी मास्कसह उपस्थित रहावे . फिजिकल डिस्टंगन्सिंगचे पालन करावे .
शक्य असल्यास आपल्या संग्रहातील एक पुस्तक महामानवाला ग्रंथमय अभिवादन या आवाहनाला प्रतिसाद देऊन जिल्हा भवनात ग्रंथालय निर्माण करण्यासाठी अर्पण करावे.
असे आवाहन जिल्हाध्यक्ष विश्वनाथ कदम
यांनी केले आहे.