वेंगुर्ला तालुका राष्ट्रवादी काँगेस पक्ष च्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन..

वेंगुर्ला तालुका राष्ट्रवादी काँगेस पक्ष च्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन..

वेंगुर्ला /-

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज जिल्ह्यात विस्तारत असून तालुका तसेच ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न कार्यालयाच्या माध्यमातून सोडवा.नजीकच्या काळात आव्हाने पेलण्यासाठी सज्ज व्हा.जिल्ह्यातील भाजपची ताकद कमी करून जिल्ह्यातील प्रमुख सत्ताकेंद्रे आपल्याकडे राखण्यासाठी जनतेचे प्रश्न सोडवा,असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळ कनयाळकर यांनी वेंगुर्ला उभादांडा येथे केले.
वेंगुर्ला तालुका राष्ट्रवादी काँगेस पक्ष च्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन वेंगुर्ला उभादांडा येथे जिल्हा पदाधिकारी बाळासाहेब कनयाळकर यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.यावेळी प्रांतिक सदस्य तथा कृषिभूषण एम.के.गावडे,जिल्हा चिटणीस दीपक नाईक,तालुकाध्यक्ष प्रसाद चमणकर,शहरअध्यक्ष सत्यवान साटेलकर,डॉ. संजीव लिंगवत,सोशल मीडिया प्रमुख सचिन पाटकर,वामन कांबळे,बावतीस डिसोझा,अल्पसंख्याक चे शेख,हकीम,संदीप पेडणेकर, मकरंद परब,संपदा तुळसकर आदींसह पदाधिकारी – कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी दीपक नाईक,सचिन पाटकर यांनी मार्गदर्शन केले.यावेळी तालुकाध्यक्ष प्रसाद चमणकर यांनी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त १ ते १५ डिसेंबर या कालावधीत विविध सामाजिक कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.

अभिप्राय द्या..