कुडाळ /-
उद्या शुक्रवार दिनांक 27 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता कुडाळ तालुका व्यापारी संघटनेच्या वतीने वाढिव व अवास्तव वीजबिल बाबत शासनाला निवेदन देण्यासाठी तहसीलदार कार्यालय येथे कुडाळ शहरातील व्यापारी व ग्राहकांनी एकत्र यावे, ग्रामीण भागातील व्यापारी सुद्धा येणार आहेत त्यांचे नियोजन केलेले आहे.कुडाळ तहसीलदार यांना निवेदन देऊन आपल्या व्यापारी वर्गातील समस्य बाबत हे निवेदन देण्यात येणार आहे.असे आवाहन कुडाळ तालुका व्यापारी संघटना अध्यक्ष श्री.संजय मुरारी भोगटे यांनी सांगितले आहे.व्यापारी संगटनेच्या कार्यकारिणी सदस्य, पदाधिकारी व व्यापारी वर्गाने उपस्थितीत राहावे.