कुडाळ तालुका माणगाव खोर्यात वाडोस ग्रांपचायत क्षेत्रात तीन ठिकाणी कोरोना संक्रमणाने बाधित पंधरा रुग्ण सापडले व माणगाव खोर्यात चिंतेच व भितीच वातावरण झाल. यात एका वाडीवर बारा रुग्ण व ईतर दोन्ही वाडीवर मिळून पंधरा च्या आसपास येवढ्या मोठ्या संखेने बाधित रुग्ण मिळाल्याने गोठोस पंचक्रोशीत नागरीकांत भिती व चींता पसरली होती. गोठोस ग्रांपचायत मार्फत शासनाने संबधित क्षेत्र केल सिल. उपसरपंच गोठस योगेश बेळणेकर व भाजपा नेते अमित परब यानी संजु विर्नोडकर शी संपर्क साधला असता या टिमने बांदा येथिल कार्य आटपुन त्वरीत गोठस येथे सायंकाळी कोरोना प्रतिबंधक कारवाई केली. गोठोस *पोयसेवाडी* येथे सर्वात जास्त सात महिला व पाच पुरुष एकुण बारा रुग्ण सापडले होते व वर्षभराचे बाळ त्याची आई व दोन लहान मुली या निगेटिव्ह त्या घरात होत्या ते आतुन बाहेरुन संपुर्ण घर, स्वच्छता गृह! शेत घर व वहाने ,आजुबाचुचा वर्दळीचा परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आला.तसेच *कोळंबवाडी* येथिल दवाखाना संबधितांचे घर आसपासची घरे वर्दळीच्या जागा निर्जतुक करण्यात आल्या. त्यानंतर वाडोस ग्रांम पचायत कार्यालयाच्या लगतच्या *देउळ वाडीवर* कोरोना बाधित रुग्ण मिळाल्याने हि संपुर्ण वाडीत प्रत्येक घरोघरी,ग्रामपंचायत कार्यालय व दुकाने निर्जतुकीकरण करण्यात आले. गोठोस नागरीकानी विर्नोडकर टिंम चे आभार मानले.मा.पंचायत सभापती आर. के सावंत ,वाडोस उपसरपंच योगेश बेळणेकर,डाॅ.सुर्वे, जेष्ठ समाजिक कार्यकर्ते प्रभाकर परब,दादा बेळणेकर माणगावचे केशव भर्तु व ग्रामस्थानी संजु विर्नोडकर टिंमचे आभार मानले. या कार्यात आकाश मराठे सचिन घाडी संतोष तळवणेकर यानी परीश्रम घेतले.