कुडाळ /-
कुडाळ बस स्टँड ते केळबाई मंदिरकडे जाणार्या रस्त्यावर माऊली काॅम्प्लेक्स समोर नगरपंचायतीने बांधलेल्या मोरी अपघातास कारणीभूत ठरताना दिसत आहे.या सादर मोरीची उंची ही रस्ता लेवलच्या दृष्टीकोनातून बरीच उंच आहे त्यामुळे अपघातास निमंत्रण ठरत आहे.या मोरीमुळे पावसाळ्यात मोरीच्या दोन्ही साईडने पाणी साचून पदचारी ,वाहन धारकांना पावसाळ्या नेहमी पाण्यातून जावे लागते.निकृष्ठ दर्जाच्या बांधलेल्या या मोरीची (पुलाची) तातडीने पाहणी करून उंची कमी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा नगरसेवक गणेश भोगटे ,स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.या पाहणी दरम्यान नगरसेवक गणेश भोगटे,ग्रामस्थ महेश सावंत,बाबा सावंत व इशुफ शेख,महेश राऊळ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थितीत होते.