कुडाळ /-
कुडाळ येथील शिवसेना उपजिल्हा प्रमुख अभय शिरसाट पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर आहेत आहेत त्यांचा काँग्रेस प्रवेश जवळपास निश्चित झाला असुन त्यांनी खुद्द याला दुजोरा दिला आहे. श्री. शिरसाट यांनी आज मंत्रालय येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व महाराष्ट्र शासनाचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात तसेच राहुल गांधी यांचे अत्यंत विश्वासू खासदार राजीव सातव तसेच माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेऊन प्रवेशासंदर्भात चर्चा केली.यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळा गावडे,उपाध्यक्ष व प्रवक्ते इर्शाद शेख,उपाध्यक्ष विजय प्रभू,जिल्हा युवक कार्याध्यक्ष किरण टेंबूलकर उपस्थित होते. अभय शिरसाट हे पुर्वी काँग्रेस मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते त्यावेळी त्यांनी फार चांगले काम केले होते. परंतू नारायण राणे यांच्या काॅग्रेस प्रवेशानंतर त्यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेत गेल्यानंतर त्यांना उपजिल्हा प्रमुख पद देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता.