कुडाळ /-

कुडाळ-मठ,पणदूर-घोडगे या रस्त्याची खड्डेमय परिस्थितीमुळे झालेली दुर्दशा आणि त्यातून जनतेला होणारा मनस्ताप यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर व मनसेचे तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी वेळोवेळी निवेदने व आंदोलनांच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना जनतेच्या रोषाची समज दिलेली आहे.परंतु निर्ढावलेल्या या भ्रष्ट व बेजबाबदार अधिकाऱ्यांनी त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत वेळकाढूपणाचे धोरण अवलंबिल्याने जनतेमध्ये प्रचंड उद्रेकाची भावना निर्माण झालेली आहे.त्यामुळे आता येत्या आठ दिवसात या रस्त्यावरील खड्डे भरणा करून रस्ता सुस्थितीत न केल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची जनतेच्या तीव्र भावना दर्शवण्यायसाठी व रस्त्यांची खड्डेमय परिस्थितिने झालेली दुर्दशा दाखवण्यासाठी आता टु व्हीलर नेच वरात काढली जाईल त्याशिवाय पर्याय उरला नाही.निवेदनांमधून विनंतीची भाषा व आंदोलनांद्वारे दिलेली समज या अधिकाऱ्यांना कळून येत नसेल तर आता महाराष्ट्र सैनिकांच्या रोषाला सामोरे जा म्हणजे जबाबदारी व कर्तव्ये आपोआप उमजून येतील असा कडक इशारा मनसेच्या वतीने उपतालुकाध्यक्ष दीपक गावडे यांनी मीडियाशी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page