मुंबई /-

बॉलीवूड इंडस्ट्रीतील कलाकार त्यांच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींमुळे नेहमीच चर्चेत असतात. अभिनेता सैफ आली खान याच्या कुटुंबातील सदस्य अलीकडे सतत कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत आहे.एकीकडे सैफ अली खानचा मोठा मुलगा इब्राहीम त्याच्या फोटोमुळे चर्चेत आहे. तर दुसरीकडे सैफ आणि करीना दुसऱ्यांदा आईबाबा होणार असल्यानं चर्चेत आहेत.मात्र, सैफ आली खान याने करीनापूर्वी अमृता सिंह हिच्याशी विवाह केला होता. सैफ आणि अमृताला इब्राहिम आणि सारा नावाची दोन मुले देखील आहेत. मात्र, काही कारणास्तव सैफ आणि अमृताच्या नात्यात दरार आली. यामुळे त्या दोघांनी घटस्फो.ट घेतला.

पुढे सैफने अभिनेत्री करीना कपूरशी लग्न केले. करीना आणि सैफला तैमुर नावाचा मुलगा देखील आहे. आता करीना पुन्हा एकदा आई होणार आहे. नुकतंच करीना आणि सैफने बेबी बम्प सोबत फोटो देखील शेअर केले होते.

एकीकडे सैफची दुसरी पत्नी आई होणार आहे. तर दुसरीकडे सैफच्या पहिल्या मुलाच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावर सैफचे अनेक चाहते त्याच्या मोठ्या मुलाच्या लग्नाबद्दल बोलत आहेत.सध्या सोशल मीडियावर इब्राहिमचे काही फोटो व्हायरल होत आहेत. नुकतंच इब्राहिमने दिवाळी फेस्टिव्हल निम्मित फोटोशूट केलं होतं. हे फोटो इब्राहिमने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले होते.

इब्राहिमने यावेळी त्याची बहीण अभिनेत्री सारा अली खानसोबत देखील फोटो काढले आहेत. मात्र, यातील इब्राहिमचा लुक लोकांना चांगलाच आवडत आहे. इब्राहिमच्या चाहत्यांनी या फोटोला डोक्यावर घेतलं आहे.इब्राहिमचे दिवाळीचे हे फोटो पाहून महिला चाहत्या तर घायाळच झाल्या आहेत. हे फोटो पाहून अनेक महिला चाहत्यांनी इब्राहिमला लग्नाची देखील मागणी घातली आहे. मात्र, इब्राहिम खान अजून लंडनमध्ये शिक्षण घेत आहे. त्यामुळे सध्या तरी इब्राहीम खानचा लग्नाचा कोणताच इरादा दिसत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page