सावंतवाडी भाजप महिला शहराध्यक्ष पदी मोहिनी मडगावकर यांची नियुक्ती

सावंतवाडी भाजप महिला शहराध्यक्ष पदी मोहिनी मडगावकर यांची नियुक्ती

सावंतवाडी /-

सावंतवाडी शहर भाजप मंडलच्या महिला शहर अध्यक्षपदी मोहिनी मडगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी त्यांना नियुक्तीपत्र भाजप शहरअध्यक्ष अजय गोंदावळे यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी नगराध्यक्ष संजू परब, नगरसेवक सुधीर आडिवरेकर, नगरसेवक आनंद नेवगी, नगरसेविका दीपाली भालेकर, आंबोली पंचायत समिती सदस्य संदीप गावडे, भाजप शहर प्रवक्ते केतन आजगावकर, बंटी पुरोहित, ज्ञानेश्वर पाटकर, प्राजक्ता मंद्राळे, परीक्षित मांजरेकर आदी उपस्थित होते. महिला शहर अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मडगावकर यांचे उपस्थित पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात आले.

अभिप्राय द्या..