कणकवली /-
तळेरे विजयदुर्ग मार्गावर दारुम झरी येथे एका आंब्याच्या झाडाला बोलेरो गाडीची ठोकर बसून झालेल्या भीषण अपघातात चालक शिवाजी यशवंत भारावकर-देसाई (वय ४९, रा. फणसगाव विठलादेवी, ता. देवगड) हे ठार झाले आहेत. हा अपघात मंगळवारी रात्री ८.३० वाजता घडला.
याबाबत वृत्त असे की, बोलेरो गाडी(एम.एच.०७ ए बी ७४७९) घेऊन चालक शिवाजी यशवंत भारावकर देसाई हे १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजताचे दरम्याने फणसगाव येथुन तळेरेकडे गाडी घेऊन गेले होते . रात्री ८.३० वाजता विजयदुर्ग पोलीसानी फिर्यादी यांना भावाची अपघाताची माहीती दिली. घरातील माणसे घेवून अपघाताच्या ठिकाणी गेलो , सदर अपघात विजयदुर्ग ते कासार्डे जाणाऱ्या डांबरी रस्त्यावर मौजे दारूम झरी येथे एका आंब्याच्या झाडाला बोलेरो गाडीची ठोकर बसली होती. त्यावेळी सदर गाडीत माझा भाऊ तसेच त्याचे सोबतचे मारूती नरसाळे जखमी अवस्थेत होते. त्यांना दुखापत होऊन रक्तस्त्राव होत होता.त्यांना आम्ही उपचाराकरता प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्र कासार्डे येथे नेले व तेथुन अधिक
उपचाराकरीता उपजिल्हा रुग्णालयात कणकवली येथे आणले असता माझा भाऊ शिवाजी बारावकर देसाई याला डॉक्टरांनी तपासले व डॉक्टरांनी तो मयत झाल्याचे मला सांगितले .
त्यानंतर डॉक्टरांनी गाडीतील मारूती नरसाळे यास दुसऱ्या हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी घेऊन जाण्यास सांगीतल्याने त्यास डॉ.नागवेकर हॉस्पीटल कणकवली यांचे दवाखान्यात उपचाराकरता दाखल केलेले आहे .मारुती नरसाळे यास गंभीर व किरकोळ दुखापती झाल्याने त्याचेवर डॉ.नागवेकर हॉस्पीटल कणकवली येथे उपचार सुरु आहेत.
याबाबत खबर प्रमोद यशवंत बारावकर यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे.अधिक तपास कणकवली पोलीस उपनिरीक्षक जगदीश बागर करत आहेत.