मालवण /-
दिवाळीचे औचित्य साधून मालवण येथील मातृत्व आधार फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या वतीने डॉ संजीव नागवेकर व डॉ.मिथिला नागवेकर यांच्यातर्फे तालुक्यातील पोईप परिसरात राहणाऱ्या कातकरी समाजातील लोकांना दिवाळी
फराळाच्या वाटप कार्यक्रमात वैभवी नरे बोलत होत्या यावेळी व्यासपीठावर डॉ. संजीव नागवेकर ,डॉ. मिथिला नागवेकर ,रमेश राणे (सेवानिवृत्त तहसीलदार) संस्थेचे संस्थापक संतोष लुडबे, सचिव विश्वास गावकर, खजिनदार मनोज खोबरेकर, तपस्वी मयेकर ,सूर्यकांत फणसेकर, दादा वेंगुर्लेकर,पी.के .चौकेकर,श्री.नागवेकर, उद्योजक वर्दम , सुहास पालव , भाऊ भोगले, विजय पालव आदि उपस्थित होते.
पोलीस पाटील विजय पालव यांनी उपस्थितांचे स्वागत केले .
यावेळी परिसरातील कातकरी समाज बांधव यांना मान्यवरांच्या हस्ते दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले त्यावेळी कातकरी समाज बांधवांच्या चेहऱ्यावरील दिसणारे हास्य व समाधान यांनी उपस्थित मान्यवर भारावून गेले.
भाऊ भोगले यांनी या स्तुत्य कार्यक्रमाचे कौतुक करून समाधान व्यक्त केले .
कोल्हापूर येथील सेवानिवृत्त तहसीलदार श्री रमेश राणे यांच्या कडून गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक आर्थिक मदत करण्यात आली.
संस्थेचे सचिव विश्वास गावकर यांनी उपस्थितांचे आभार मानले
या कार्यक्रमास पोईप मधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते