ना.एकनाथ शिंदे यांच्या सौजन्याने मालवण शहरातील रिक्षा व्यावसायिकांना दिवाळीनिमित्त भेटवस्तूंचे वाटप..

ना.एकनाथ शिंदे यांच्या सौजन्याने मालवण शहरातील रिक्षा व्यावसायिकांना दिवाळीनिमित्त भेटवस्तूंचे वाटप..

मालवण /-

दिवाळीच्या निमित्ताने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सौजन्याने व कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून मालवण शहरातील रिक्षा व्यावसायिकांना दिवाळीच्या भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत मालवण बसस्थानक, भरडनाका, पिंपळपार येथील रिक्षा व्यावसायिकांना हे साहित्य देण्यात आले.
कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे रिक्षा व्यावसायिकांचे नुकसान झाले होते. दिवाळी सणात त्यांना मदत म्हणून आ.वैभव नाईक यांच्या माध्यमातून गृहोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.यावेळी रिक्षा व्यावसायिकांनी आ.वैभव नाईक यांचे आभार मानले.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे,तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, शहरप्रमुख बाबी जोगी,नगरसेवक मंदार केणी, यतीन खोत,पंकज सादये, तृप्ती मयेकर,राजू परब,रश्मी परुळेकर, गणेश कुडाळकर,मंदार ओरोसकर,नंदू गवंडी, तपस्वी मयेकर, महिला तालुकाप्रमुख दीपा शिंदे, पल्लवी पारकर,रवी तळाशीलकर,अक्षय भोसले आदींसह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

अभिप्राय द्या..