कुमारी सोहनी संदीप साळसकर शिष्यवृत्ती परीक्षेत कुडाळ तालुक्यात प्रथम..

कुमारी सोहनी संदीप साळसकर शिष्यवृत्ती परीक्षेत कुडाळ तालुक्यात प्रथम..

कुडाळ /-

पाट हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश
पाट हायस्कूलच्या सहा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली असून त्यांनी विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.फेब्रुवारी 2020 मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झाली असून या यादीत जिल्ह्याच्या राष्ट्रीय ग्रामीण सर्व साधारण गटात इयत्ता पाचवी तून कुमारी सोहनी संदीप साळसकर हिने तालुका प्रथम क्रमांक आणि जिल्ह्यात सहावा क्रमांक पटकावला तर कुमार यश प्रशांत चव्हाण याने ग्रामीण सर्वसाधारण गटात तालुका आठवा तर जिल्हा गुणवत्ता यादीत सत्तावन वा क्रमांक मिळवला.
इयत्ता आठवी च्या माध्यमिक विभागातून राष्ट्रीय ग्रामीण सर्व साधारण गटातून कुमारी देविका गिरीधर पडते हिनेआठवा क्रमांक पटकावला ,कु.पाटकर सार्थ सच्चिदानंद याने चौदावा क्रमांक पटकावला ,कु.गावडे भक्ती गुरूनाथ हिने बावीसावा क्रमांक मिळवला,
कु.आजगांवकर भाग्यश्री रविंद्र हिने सत्तेचाळीसावा क्रमांक पटकावला. प्रशासन ,शिक्षक , त्याचबरोबर संस्था पदाधिकारी यांचे अनमोल मार्गदर्शन ,पालकांची व विद्यार्थ्यांनी केलेली मेहनत याचेच हे फलित आहे.

अभिप्राय द्या..