खोपोली “परळी जांभूळपाडा “लोहाना “महाजन व सहजसेवा फाऊंडेशनचा सामाजिक उपक्रम..
कोल्हापूर /-
खोपोली ( जि. रायगङ) शहरात व तालुक्यात निधन झालेल्या व्यक्तींचे नातेवाईक काही वेळा दूरवरून येणार असतील तर निधन झालेल्या व्यक्तींना इतर ठिकाणी काही कालावधीसाठी ठेवावे लागते.त्यावेळी कुटुंबियांची होणारी तारांबळ लक्षात घेता खोपोली परळी जांभुळपाडा लोहाना महाजन व सहज सेवा फौंडेशन,खोपोली यांच्या वतीने खोपोली शहरात सदर शवपेटीची व्यवस्था ( 24 तास सेवा ) उपलब्ध करण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ दिनांक 12 नोव्हेंबर 2020 रोजी लोहाना समाज हॉल, खोपोली येथे करण्यात आला.
या शीतपेटीचे उदघाटन शीळफाटा येथील उद्योजक जयेश ठक्कर यांच्या मातोश्री श्रीमती देवमनी ठक्कर यांच्या हस्ते पार पडले.यावेळी खोपोली नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुमन औसरमल,गटनेते सुनील पाटील,नगरसेवक राजू गायकवाड,किशोर पानसरे याचसोबत खोपोली परळी जांभुळपाडा लोहाना महाजन व सहज सेवा फौंडेशन,खोपोली चे पदाधिकारी,खोपोली शहरातील व्यापारी, हास्य क्लबचे पदाधिकारी,खोपोलीतील नागरिक, पत्रकार उपस्थित होते.
या शीतपेटीमुळे दुःखद प्रसंगात नागरिकांना सेवा मिळेल,जीवन व मृत्यू या बाबतीत तत्पर सेवा देणाऱ्या खोपोली परळी जांभुळपाडा लोहाना महाजन व सहज सेवा फौंडेशन,खोपोली यांचे आभार मानतो अशी प्रतिक्रिया खोपोली नगरपरिषदेचे गटनेते सुनील पाटील यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली.डॉ.शेखर जांभळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.