कोल्हापूर /-
भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या कोल्हापूर विभागा अंतर्गत येणाऱ्या कागल एस.एस.ओ. या नवीन शाखेचा उदघाटन सोहळा नूकताच संपन्न झाला .
शाखेचे उदघाटन भारतीय आयुर्विमा महामंडळाचे पश्चिम क्षेत्रीय प्रबंधक श्री. विकास राव यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने पार पडले. तसेच सदर उदघाटन प्रसंगी कोल्हापूर विभागाचे वरिष्ठ मंडल प्रबंधक श्री. संदीप मोघे यांनी फित कापून व कोनशिलेचे अनावरण करून शाखेचे उदघाटन केले.
कागल नगरीतील विमाधारकांसाठी हे शाखा कार्यालय अतिशय जोमाने काम करेल अशी ग्वाही मान्यवरांनी या प्रसंगी दिली.याप्रसंगी श्री.जगदिशा, विपणन प्रबंधक, श्री.गुळवणी, विक्रय प्रबंधक, मुरगुड शंकेचे प्रबंधक श्री. लक्ष्मण कोळी हे प्रमुख उपस्थितीत होते. तसेच असंख्य विमाधारक, विमाप्रतिनिधी, विकास अधिकारी, अधिकारी व कर्मचारी या उदघाटन सोहळ्यास उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक नूतन शाखेचे शाखा इनचार्ज श्री. प्रशांत घाटगे यांनी केले.