एस. एल. देसाई विद्यालय पाट येथे कै.श्रीमती मीराताई जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
एस. के .पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी संस्थेच्या माजी कार्याध्यक्षा, उपाध्यक्षा, राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या ,मुख्याध्यापिका, निर्भीड पत्रकार व थोर समाजसेविका श्रीमती मीरा माधवराव जाधव यांचे शनिवार दिनांक ३१सप्टेंबर२०२० रोजी वयाच्या ९३ व्या वर्षी वार्धक्याने दुःखद निधन झाले ,मीराताई जाधव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एस .एल. देसाई विद्यालय पाट येथे दिनांक११ नोव्हेंबर२०२० रोजी शोकसभेचे आयोजन केले होते .एस एल देसाई विद्यालय पाट आणि कै सौ. सिताबाई रामचंद्र पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी एस .के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी संस्थेचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत विद्यमान कार्याध्यक्ष श्री रामचंद्र रेडकर व सर्व संस्था पदाधिकारी यांच्या हस्ते कै मीराताई जाधव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. सर्व संस्था पदाधिकारी सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रीमती मीराताई जाधव यांना श्रद्धांजली वाहिली .निरोगी ,प्रभावी व परखड व्यक्तिमत्व ,कुशल प्रशासक सामाजिक व शैक्षणिक कार्यकर्त्या आज आपल्यात नसल्याने संस्थेची अपरिमित हानी झाली अशा शब्दात संस्थेच्यावतीने व संस्था सदस्य सन्माननीय सुधीर ठाकूर यांनी कै. श्रीमती मीराताई जाधव यांना श्रद्धांजली वाहिली. नीटनेटकेपणा, आनंदी स्वभाव,एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात त्यांच्या कार्याचा दबदबा होता.शिक्षण प्रेमी विशेष करून मुलींवर प्रेम त्या करायच्या त्यांनी केलेले कार्य संस्थेसाठी अविस्मरणीय आहे अशा शब्दात संस्था कार्यवाह श्री डी.ए. सामंत यांनी कै श्रीमती मीराताई जाधव यांना श्रद्धांजली वाहिली.आणि आपले मनोगत व्यक्त केले. संस्थेविषयी प्रचंड आदर, दातृत्व ,वक्तृत्व, शिस्तप्रिय, आदर्श मुख्याध्यापिका या गुणवैशिष्ट्यानी परिपूर्ण अशा त्या होत्या .त्यांच्या निधनाने आपली संस्थेची व प्रशालेची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे अशा शब्दात प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय श्री कोरे सर यांनी श्रद्धांजली वाहिली. प्रशालेचे उपमुख्याध्यापक माननीय श्री आर .डब्ल्यू. ठाकूर ,ज्येष्ठ शिक्षिका माननीय सौ सामंत दिपीका ज्येष्ठ शिक्षक श्री. संदीप मधुसूदन साळसकर सौ जान्हवी पडते.सौ अंकीता मोडक. माड्याचीवाडी प्रशालेचे शिक्षक माननीय श्री दीपक सामंत या सर्वांनी कै. श्रीमती मीराताई जाधव यांनी आपल्या ओघवत्या भाषाशैलीत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय श्री शामराव कोरे यांनी केले या शोकसभेला संस्थेचे माजी कार्याध्यक्ष माननीय श्री श्री विकास गवंडे माननीय श्री मिलिंद केळूसकर विद्यमान संस्था कार्याध्यक्ष माननीय श्री रामचंद्र रेडकर कार्यवाह माननीय श्री .डी .ए . सामंत संस्था सदस्य बाबा तळवडेकर श्री सुधीर ठाकूर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री .एस पी.कोरे व सर्व शिक्षक, शिक्षिका , शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.