गाबित समाज महासंघाचे अध्यक्ष तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांची माहिती..
मालवण /-
केंद्र सरकारने मत्स्य दुष्काळावर उपाययोजना करणेकरीता प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना जाहीर केली असून मच्छिमारांमध्ये या योजने विषयी प्रबोधन करून या योजनेचा त्यांना लाभ करून देण्याच्या दृष्टीने जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मालवण,देवगड, वेंगुर्ले आणि आरोंदा येथे प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात येणार असून या शिबिरात मस्य विभागाचे अधिकारी तसेच अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाचे पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाचे अध्यक्ष , माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिली
प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या अनुषंगाने आज अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाचे अध्यक्ष माजी आमदार परशुराम उपरकर, संघटक चंद्रशेखर उपरकर, जिल्हा सचिव तुलसीदास गांवकर, जनार्दन आजगावकर आदींनी मालवणच्या मस्य व्यवसाय उपआयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि यासंबंधी निवेदन दिले
केंद्र सरकारने मत्स्य दुष्काळावर उपाययोजना करणेकरीता प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना २०२०-२१ या वर्षांतर्गत महिलांना ६० टक्के व पुरुषांना ४० टक्के अनुदानाची योजना जाहीर केलेली आहे. या योजने अंतर्गत भुजल, मत्स्यव्यवसाय, शोभिवंत मत्स्यव्यवसाय, आधुनिक तंत्रज्ञान मत्स्यव्यवसाय, काढणी पश्चात शेतसाखळीकरीता पायाभूत सुविधा, सागरी मत्स्यव्यवसाय, निमखारेपाणी मत्स्यव्यवसाय, लाभार्थिभिमुख नसलेल्या योजनांचा समावेश केलेला आहे. त्यातुन सिंधदुर्ग जिल्ह्यामध्ये व कोकणात राबविण्यासारख्या आहेत व किनारपट्टीवर मत्स्ययोजना करु शकतात अशा योजनांची मच्छिमारांना माहीती देण्यासाठी सिंधदुर्गातील देवगड, मालवण, वेंगुर्ले तसेच सावंतवाडी तालुक्यातील आरोंदा येथे शिबारे आयोजित करण्यात आली आहेत . या योजनेच्या प्रबोधनाकरिता समाजाच्यावतीने लाभार्थ्यांना एकत्रीत करुन त्यांना माहीती देण्याकरिता मस्य व्यवसाय अधिकारी यांनी उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.