मसुरे /-
पळसंब गावचे सरपंच चंद्रकांत गोलतकर यांना महिन्याभरा पूर्वी आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त झाला. त्या निमित्ताने त्यांनी शिक्षण घेतलेल्या आचरा काँलेजच्या २००१ च्या सहकाऱ्यांनी ऐकत्र येऊन गोलतकर यांचा शाल, श्रीफळ, भेटवस्तु देऊन सत्कार केला.
यावेळी दिगंबर सारंग(सावंतवाडी), एकनाथ साटम(त्रिंबक),महेश शेटये(आचरा), देविदास सावंत(मुणगे). परेश चव्हान(चिंदर), मुकेश पुजारे(आचरा), विवेक(राजु)परब(चिंदर) दशरथ पडवळ(आचरा), निलेश सावंत(मुणगे), गणेश मयेकर(मुणगे), अजय कोयंडे(आचरा), सुदर्शन गावकर(आचरा) हे उपस्थित होते.