वेंगुर्ला /-
शिवसेनेचे युवासेनाप्रमुख तथा पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत , सिंधुदुर्ग संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, सावंतवाडी विधानसभा प्रमुख विक्रांत सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, सिंधुदुर्ग युवासेना विस्तारक अमित पेडणेकर यांच्या मार्गदर्शनानुसार सुयोग चेंदवणकर यांची वेंगुर्ला युवासेनेच्या शहर प्रमुखपदी तसेच जयेश परब यांची उपशहर प्रमुख पदी नियुक्ति करण्यात येत असल्याचे युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट व युवासेना तालुकाप्रमुख पंकज शिरसाट यांनी जाहिर केले आहे.या निवडीबद्दल शिवसेना, युवासेना व महिला आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने चेंदवणकर व परब यांच्यावर अभिननंद वर्षाव होत आहे.