अवैद्य व्यवसायाकडे तरुण वळण्यास जिल्हा पोलीस अधीक्षक जबाबदार

अवैद्य व्यवसायाकडे तरुण वळण्यास जिल्हा पोलीस अधीक्षक जबाबदार

सावंतवाडी प्रतिनीधी

सावंतवाडी गोवा बनावटीच्या खुलेआम दारूविक्रीमुळे जिल्ह्यातील महसूल गोव्याला जात असून राज्याचे नुकसान होत आहे. तसेच जिल्ह्यतील अनेक तरुण अवैध व्यवसायाकडे वळत आहेत. याला राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारीच जबाबदार असून त्यांच्याकडून तडजोड होत असल्यानेच अवैध दारू विक्री खुलेआम होत आहे. तसेच या अवैध धंद्याकडे वळणाऱ्या तरुणांसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक जबाबदार आहेत, असा सनसनाटी आरोप सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी केला. त्यामुळे तत्कालीन जिल्हा पोलीस अधिक्षक प्रसन्ना यांचा आदर्श घेऊन जिल्हा पोलीस अधिक्षक गेडाम यांनी उचित कारवाई करावी अन्यथा पोलिस अधिक्षकांच्या विरोधातच मला आंदोलन हाती घ्यावे लागेल असा इशारा ही संजू परब यांनी दिला.अवैध दारू विक्री आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी आयोजित बैठकीत नगराध्यक्षांनी हा इशारा दिला. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शेखर गाड, नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी, भाजपचे शहर मंडल उपाध्यक्ष अजय गोंधावळे, जिल्हा सरचिटणीस निशांत तोरस्कर, केतन आजगांवकर, जितू पंडित कुलकर्णी, महेश कुमठेकर, रवि शेट्टी, प्रथमेश म्हाडेश्वर, जॉनी डेनीस डान्टस, रेमी आल्मेडा, विनोद तावडे, महेश नार्वेकर उपस्थित होते.

– अंजली गावडे

अभिप्राय द्या..