बांदा /-
गेल्या महिन्यात सतत पडलेल्या अती पावसामुळे घारपी परिसरातील डोंगरी भागातील नाचणी पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होऊन लाखो रुपयांचे नुकसान
झाले आहे.कोरोनाच्या संकटकाळात शेतकरी नुकताच कुठे तरी बाहेर येत असतानाच पुन्हा एकदा शेतकऱ्यांना नुकसानीला समोरे जावे लागत आहे.अतिवृष्टीमुळे नाचणी पिकांची शेतकऱ्यांची वर्षभराची पोटगी नष्ट झाल्याने शेतक-यांचे अश्रु अनावर झाले आहेत. शासनाने शेतक-यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडुन होत आहे. अशा संकटात पंचनाम्यासाठी शासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे असा आरोप असनिये घारपी परिसरातील शेतकऱ्यांनी केला आहे. पावसाच्या अतिवृष्टीचा फटका भातपिकाबरोबर नाचणी पिकांनाही बसला आहे.
घारपी असनिये परिसरातील डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात नाचणीची शेती करण्यात आली आहे. पण गेल्या महिन्यात अतिवृष्टी मुळे तयार नाचणी पिकांवर पुर्णता: रोगाचा प्रादुर्भाव होऊन पिक पुर्णत: उद्वस्त झाले आहे. याबाबत बांदा कृषी मंडळ कार्यालयास कळवून संबधित कृषी अधिकारी पहाणी करण्यास आलेच नसल्याची खंत असनिये घारपी येथील शेतकर्यांनी व्यक्त केली. पंचनामा करण्यासाठी अधिकारी जर टाळाटाळ करत असतील किंवा शेतकरी अशी कुती खपवून घेणार नाही. येत्या पाच दिवसांत पंचनामा न झाल्यास बांदा कृषी मंडळ अधिकाऱ्यांनाच घेराव घालून जाब विचारणार असल्याचे असनिये, घारपी परिसरातील शेतकर्यांनी सांगिलते.
गती वर्षी अतिवृष्टीमुळे काज, सुपारी, इतर पिकांचे मिळून आंम्हा शेतकऱ्यांचे सुमारे ३ लाखांचे नुकसान झाले. कृषी विभागाने पंचनामे कागदीपत्री केले. पणं या वर्षी पर्यत एकही रुपया मिळाला नाही. असा आरोप शेतकरी प्रेमानंद नारायण ठिकार, यांनी केला.