तळगाव मध्ये नवीन तलाठी कार्यालयाचे ना. उदय सामंत,खा.विनायक राऊत, आ.वैभव नाईक यांच्या हस्ते उद्घाटन

तळगाव मध्ये नवीन तलाठी कार्यालयाचे ना. उदय सामंत,खा.विनायक राऊत, आ.वैभव नाईक यांच्या हस्ते उद्घाटन

मालवण /-

आमदार वैभव नाईक यांनी पाठपुरावा करून कुडाळ मालवण मतदारसंघात सर्वात जास्त तलाठी सजा मंजूर करून घेतले. हे तलाठी सजा प्रत्यक्षात सुरु होऊन त्याचे उद्घाटन होत आहे. या मतदारसंघात सर्वात जास्त निधी आणण्याचे येथील प्रश्न जाणून घेऊन ते मार्गी लावण्याचे कामही आ. वैभव नाईक यांनी केले आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आमदार म्हणून आदर्श घ्यावा असे काम वैभव नाईक यांचे आहे,अशा शब्दात पालकमंत्री उदय सामंत यांनी आ. वैभव नाईक यांचे कौतुक केले.
मालवण तालुक्यातील तळगाव मध्ये नव्याने मंजूर झालेल्या तलाठी कार्यालयाचे उद्घाटन खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत तर पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते फीत कापून तर आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.अतिवृष्टीमुळे जिल्हयात २३ हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. या भरपाईसाठी पहिल्या टप्प्यातील साडेपाच कोटी रुपये जिल्हयाला प्राप्त झाल्याचे ना. उदय सामंत यांनी सांगितले.
यावेळी खा.विनायक राऊत म्हणाले, तलाठी कार्यालयांचे संपूर्ण श्रेय हे आ. वैभव नाईक यांचे आहे.मतदारसंघातील प्रत्येक गावच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करतात. तळगाव हे आदर्श गाव असून येत्या काळातही केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही त्यांनी दिली.
आ. वैभव नाईक म्हणाले, तलाठी कार्यालय हे गावची शान आहे. एका तलाठी कार्यालयावर अनेक गावांचा भार असल्याने लोकांची कामे रेंगाळत होती. त्याची दखल घेऊन कुडाळ व मालवण मध्ये जास्तीत जास्त तलाठी सजा व मंडळ कार्यालय होण्यासाठी प्रयत्न केलेत. नव्याने मंजूर झालेल्या या तलाठी कार्यालयामुळे लोकांची सातबारा व जमीन विषयक कामे आता सुलभ रित्या होणार आहेत.
याप्रसंगी तळगाव गावाच्या वतीने सरपंच सौ अनघा वेंगुर्लेकर व उपसरपंच श्री चव्हाण यांच्या हस्ते खा. विनायक राऊत, ना.उदय सामंत व आ. वैभव नाईक यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तलाठी कार्यालय मंजूर केल्याबद्दल आ. वैभव नाईक यांचे विशेष आभार मानले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, माजी महापौर श्री दत्ता दळवी, जिल्हा परिषद गटनेते नागेंद्र परब, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, प्रांताधिकारी सौ वंदना खरमाळे, तहसीलदार अमोल पाठक, निवासी तहसीलदार आनंद मालवणकर, तलाठी सौ सामंत, सरपंच सौ अनघा वेंगुर्लेकर व उपसरपंच श्री. चव्हाण , शाखाप्रमुख संतोष पेडणेकर यांसह शिवसेना पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अभिप्राय द्या..