सावंतवाडी /-
शहरात रात्री दुचाकी रस्त्यावर पार्क केल्याच्या रागातून
सावंतवाडी येथील दोन युवकांनी
एका युवकावर चाकूने हल्ला केला. या प्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी या दोन्ही आरोपी युवकांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणाचा अधिक तपास एपीआय सय्यद यांच्यासह पोलिस प्रसाद कदम करत आहे.