वाळूच्या भरमसाठ दरामुळे बांधकाम कामगारांवर उपासमारीची आलीय वेळ.;मनसे सिंधुदुर्ग आक्रमक

कुडाळ /-

वाळूमाफिया व भ्रष्ट अधिकारी यांच्या संगनमताने जिल्ह्यातील वाळूचा गोवा राज्यात पुरवठा होतोय…मात्र जिल्ह्यातील जनतेला चोरट्या वाळूचे दर परवडत नसल्याने मोठा मनःस्ताप सहन करावा लागतोय असे चित्र आहे.परिणामी जिल्ह्यातील बांधकामे रेंगाळली आहेत ज्याचा फटका बांधकाम कामगारांना मोठ्या प्रमाणात बसत आहे.याची गंभीर दखल घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्ह्यातील अवैध वाळू उपशावर प्रतिबंध घालुन अधिकृत वाळूची लिलाव प्रक्रिया राबवून जिल्ह्यातील जनतेला अल्प दरात वाळू पुरवठा व्हावा या मागणींसाठी उद्या मंगळवार दि.10 नोव्हेंबर 2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यलयासमोर लक्षवेधी धरणे आंदोलन सकाळी ठीक 11.00 वाजता माजी आमदार जीजी उपरकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे अशी माहिती मनसेचे जिल्हा सचिव बाळा पावसकर व कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page