▪️अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करत जो बायडेन विजयी ठरले आहेत. लवकरच बायडेन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून ते लवकरच पदभार स्विकारतील.
▪️निवडणूक जिंकल्यानंतर अनेकांकडून बायडेन यांना शुभेच्छा येत आहेत. यामध्येच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करत जो बायडेन यांचे अभिनंदन केले आहे.
*पंतप्रधान मोदी म्हणाले* : ‘निवडणूकीत तुम्ही मिळवलेल्या नेत्रदीपक विजयासाठी तुमचं मनापासून अभिनंदन.
▪️याआधीही तुम्ही उपराष्ट्राध्यक्षपदी काम करत असताना भारत-अमेरिका संबंध दृढ करण्यादृष्टीने तुमची भूमिका निर्णायक तसंच मोलाची होती.’
▪️’आता देखील तुम्ही निवडून आल्यानंतर भारत आणि अमेरिकेच्या संबंधांना अजून उंचावर नेण्यासाठी एकत्र मिळून काम करु अशी अपेक्षा करतो,’ असेही मोदी म्हणाले.