ब्युरो न्यूज /-
व्हॉट्सअपच्या माध्यमातुन आता आपल्याला पैसेही पाठवता येणार आहेत. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया( NPCI) नं व्हॉट्सअपला यासाठीची परवानगी दिली आहे. या आधी गुगल पे, फोन पे आणि इतरही माध्यमांद्वारे पैसे पाठवण्याची अशी सुविधा देण्यात आलेली आहे. त्यात आता व्हॉट्सअपची आणखीन भर पडली आहे. यामुळे आता भारताची डिजिटल पेमेंट पद्धत आणखीन मजबुत झाली आहे असा विश्वास जाणकारांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून व्हॉट्सअप प्रायोगिक तत्वावर ही सुविधा देत आहे. मात्र त्याला एनपीसीआय (NPCI) ची परवानगी नसल्यानं, ती आतापर्यंत सार्वजनिक करण्यात आली नव्हती. आजच्या तारखेला संपूर्ण भारतात तब्बल चाळीस कोटी व्हॉट्सअपचे ग्राहक आहेत. त्याचवेळी गुगल पेचे भारतात साडे सात कोटी आणि फोन पे चे ६ कोटी ग्राहक आहेत.