ब्युरो न्यूज /-

हिंदू दिनदर्शिके प्रमाणे कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीला धनतेरस सण साजरा करतात. या दरम्यान गोत्रिरात्र उपवास सुरू होतात. या दिवशी खरेदी करणे,शुभ मानले जाते.या दिवशी 5 खास वस्तू विकत घेण्यासाठी शुभ मुहूर्त जाणून घ्या.;

1• सोनं – या दिवशी सोनं किंवा चांदीचे दागिने घेण्याची प्रथा आहे. सोनं हे लक्ष्मी आणि बृहस्पतीचे प्रतीक आहे. म्हणून सोनं घ्यावे. काही लोक सोनं किंवा चांदीची नाणी देखील विकत घेतात.

2• भांडे – या दिवशी जुन्या भांड्यांना बदलून यथाशक्ती तांबे, पितळ, चांदीची घरगुती नवीन भांडी खरेदी करतात. पितळ्याची भांडी हे लक्ष्मी आणि बृहस्पतीचे प्रतीक आहे.

म्हणून या दिवशी सोनं घेऊ शकत नसल्यास पितळ्याची भांडी आवर्जून घ्या.
3• धणे – या दिवशी जिथे ग्रामीण क्षेत्रात धण्याचे बियाणं विकत घेतात तिथे शहरी भागात पूजेसाठी अख्खे धणे विकत घेतात. या दिवशी कोरडे धणे वाटून गुळासह मिसळून एक मिश्रण बनवून नैवेद्य तयार करतात.

4• नवीन कापड – या दिवशी दिवाळीसाठी नवे कापडे घेण्याची प्रथा आहे.

5• इतर वस्तू – या शिवाय या दिवशी दिवाळीच्या पूजेसाठी लक्ष्मी-गणेशाची मूर्ती, खेळणी, साळीच्या लाह्या-बत्ताशे इत्यादी विकत घेतात. या दिवशी लक्ष्मी, गणेश, कुबेर, धन्वंतरी आणि यमराजची पूजा केली जाते. या दिवशी ग्रामीण भागात प्राण्यांची पूजा करतात.

★पूजेचे मुहूर्त –

यंदा धनतेरसची त्रयोदशी तिथी 12 नोव्हेंबर 2020 गुरुवारी रात्री 9 वाजून 30 मिनिटापासून सुरू होऊन 13 नोव्हेंबर शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजून 59 मिनिटापर्यंत असणार.
13• नोव्हेंबर अनुसार यंदाच्या धनतेरसच्या पूजेसाठी संध्याकाळी 5 वाजून 28 मिनिटापासून संध्याकाळी 5 वाजून 59 मिनिटा या दरम्यान मुहूर्त आहे. खरेदी करण्यासाठी धनतेरस मुहूर्त – 17:34:00 ते 18:01:28 पर्यंत असणार.
खरेदीचे मुहूर्त –
★• 12 नोव्हेंबर खरेदारी करावयाची असल्यास सकाळी 11:20 ते 12:04 पर्यंत अभिजित मुहूर्त आहे. नंतर रात्री 8:32 ते 9:58 पर्यंत अमृत काळ असणार.
★• 13 नोव्हेंबर रोजी खरेदी करावयाची असल्यास सकाळी 11:20 ते 12:04 पर्यंत अभिजीत मुहूर्त आहे.
★• 12 नोव्हेंबर 2020, गुरुवार रात्री 9:30 पासून 13 नोव्हेंबर सकाळी 6:42 मिनिटा पर्यंत, नक्षत्रे हस्त, चित्रा तिथी त्रयोदशी.
★• 13 नोव्हेंबर 2020, शुक्रवारी सकाळी 6 वाजून 42 मिनिटे पासून संध्याकाळी 5 वाजून 59 मिनिटापर्यंत, नक्षत्र – चित्रा आणि तिथी त्रयोदशी तिथी असणार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page