कुडाळ /-
आपल्या संस्कृतीत उजाळा, किल्ले संवर्धन प्रेम महत्त्व लोकांमध्ये जागृती हेच उद्दिष्ट ठेवून युवा फोरम,भारत तर्फे कुडाळ येथे किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे .इच्छुक स्पर्धकांनी आपली १२ नोव्हेंबर पर्यंत नावे नोंदवावी असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी,आपली परंपरा जोपासण्यासाठी, सध्याच्या काळात आपली मराठी संस्कृती लोप पावत चाललेली आहे आपल्या संस्कृतीला उजाळा देण्यासाठी व किल्ले संवर्धन प्रेम महत्व लोकांमध्ये जागृत करण्यासाठी युवा फोरम,भारत तर्फे कुडाळ येथे किल्ले स्पर्धा घेण्याचे आयोजित करण्यात आले आहे. यासाठी 1500, 1000 आणि 500 आणि सर्टिफिकेट असे आकर्षक बक्षीस ठेवण्यात आले आहे. नाव नोंदवायची तारीख १२ नोव्हेंबर पर्यंत असून ज्यांना संधीचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी लवकरात लवकर आपली नावे नोंदवावी. युवा फोरम ,भारत संघटना नेहमीच काही ना काहीतरी उपक्रम राबवत असते.पण ह्या वेळी एक वेगळ्याच प्रकारचा उपक्रम घेऊन युवा फोरम,भारत सर्वांच्या भेटीला येतेआहे .महाराष्ट्र हे गड , किल्ले,लेण्या,नद्या यांनी संपन्न अस राज्य आहे इथे राहणारी बहुसंख्य मराठी भाषिक आणि त्यांचा आवडता सण म्हणजे दिवाळी.तसे इतर सर्वच सण साजरे केले जातात पण दिवाळीचे एक आपले खास वैशिष्ट्य आहे.दिवे, उटणे,नवीन कपडे,किल्ले,लक्ष्मीपूजन भाऊबीज,पाडवा अस बरच काही घडत असत.पण ह्यात किल्ले बनवणे हा सोहळा मात्र बच्चे कंपनी दरवर्षी प्रमाणे साजरा करतात. यासाठीच हा उपक्रम राबविण्यात येणार आहे अशी माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे