कुडाळ /-

शिवप्रेमी सिंधुदुर्गच्यावतीने शुक्रवार दि. ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता कुडाळ मालवण रस्त्यावर खड्डे भरा मोहीम करण्यात येणार आहे. ही मोहीम मालवण – कुडाळ रस्ता, नाबरवाडी सकाळी ७ वा . होणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार निवेदन देऊनही दुर्लक्ष करण्यात येत आहे.

खड्डे बुजवण्यासंदर्भात अनास्था दिसून येत आहे. अशावेळी एक शिवप्रेमी तसेच सर्वसामान्य जागरूक नागरिक म्हणून आपले कर्तव्य म्हणून आपणच पुढाकार घेऊन काहीतरी कृती करणे अपेक्षित आहे. केवळ चर्चा करून, निवेदन देऊन, राजकीय आरोप करून हा प्रश्न सुटणार नाही. ज्यावेळी सामान्य माणूस जागा होतो, तेव्हा अनेकांना नमते घ्यावे लागते इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची स्थापना ही याच पद्धतीने झाली होती, हे शिवप्रेमी म्हणून आपल्या नेहमी लक्षात राहायला पाहिजे.

हे आंदोलन हे कुठल्या पक्षाच्या विरोधात नसून सामान्य जनतेला जो प्रवासा दरम्यान त्रास होत आहे, तो यामाध्यमातून व्यक्त केला जाणार आहे . त्यामुळे सर्वांनी आपले सामाजिक कर्तव्य म्हणून उद्याच्या मोहिमेत एक मावळा म्हणून सहभागी व्हावे, रस्त्याच्या स्थिती बद्दल अनेक जण केवळ चर्चा करतात काही जण बघ्याची भूमिका घेतात, मात्र एक शिवप्रेमी म्हणून प्रत्यक्ष कृती करण्यात येणार आहे.यात सर्वांनीच सहभागी व्हावे असे आवाहन शिवप्रेमी ग्रुपच्या माध्यमातून करण्यात आले आहे वाहतुकीला कोणताही अडथळा न आणता केवळ खड्डे भरण्यात येणार आहेत. सर्वांनी वेळेत उपस्थित राहून येताना कुदळ, फावडे, घमेले इ. अवजार घेऊन यावे. व मास्क बंधनकारक वापरणे बंधनकारक आहे अशी माहिती शिवप्रेमी ग्रुपच्या वतीने देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page