कुडाळ /-

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून सदरचे सरकार जनतेशी सूड बुद्धीने वागत आहे.
सरकार विरोधी कारनाम्यावर आवाज उठविणाऱ्या पत्रकार, नागरिक यांच्याविषयी सरकारचे वागणे अत्यंत द्वेषाचे आहे,याचा प्रत्यत्य आजच्या घटनेने राज्याला नव्हे तर संपूर्ण देशाला आला आहे.आर्किटेक्ट अन्वय नाईक यांनी केलेली आत्महत्या ही त्यांच्या वैयक्तिक समस्येतून झालेली आहे.तरीही या घटनेत अर्णब गोस्वामी या पत्रकाराला नाहक गुंतवून सरकार आपल्या विरोधी व्यक्त होणाऱ्या नागरिकांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे.ही घटना भारतीय लोकशाहीची गळचेपी करणारी अशी आहे.आम्ही भाजपा युवा मोर्चा या नात्याने या घटनेचा तीव्र निषेध करतो.सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा पूर्णपणे पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या पाठीशी असून सरकारने त्यांच्यावर होत असलेला अन्याय त्वरित थांबवावा अन्यथा कुडाळ तालुक्यात भाजपा युवा मोर्चा च्या वतीने तीव्र निषेध आंदोलन उभारण्यात येईल,त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील याची आपण पोलीस प्रमुख या नात्याने नोंद घ्यावी.असे निवेदन भाजप युवा मोर्चा कुडाळ च्या वतीने देण्यात आले त्यावेळी उपस्थित भाजप जिल्हा उपाध्यक्ष रणजीत देसाई,कुडाळ तालुका अध्यक्ष विनायक राणे,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पप्या तवटे,जिल्हा चिटणीस बंड्या सावंत,ओबीसी सेल जिल्हा संयोजक दिपलक्ष्मी पडते,महिला मोर्चा कार्यकारणी सदस्या साक्षी सावंत.अदिती सावंत,जेष्ठ कार्यकर्ते राजू राऊळ,ममता धुरी,राकेश कांदे, राजेश पडते,अविनाश पराडकर, विजय कांबळी,सुनिल बांदेकर,वरूनेश्वर राणे,चंदन कांबळी,लक्ष्मी आरोनदेकर,प्रथमेश परब,सुश्मित बांबूलकर, निखिल कानदळगाकर,ऋनाल कुंभार,प्रिंतेश गुरव,प्रसन्न गंगावणे,आदी भाजप कुडाळ तालुका तसेच युवा मोर्चा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page