कुडाळ /-
शिवसेनेला जिल्ह्यातून हद्दपार करणार असल्याचे सांगणारे माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांना जनतेने चार वेळा हद्दपार केले असून आता २०२४ साली पुन्हा हद्दपार करणार असल्याचा टोला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते व जिल्हाबँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी लगावला. राणे यांना हद्दपारीची घाई लागली असेल तर त्यांनी आमदार नितेश राणे यांना राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढविण्यास सांगावे, असे आव्हान सतीश सावंत यांनी राणे यांना दिले.
कुडाळ येथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते व जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी जिल्हा परिषद गटनेते नागेंद्र परब, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विकास कुडाळकर, तालुकाप्रमुख राजन नाईक, माजी पंचायत समिती अतुल बंगे, रुपेश पावसकर, नगरसेवक सचिन काळप, राजू गवंडे आदी उपस्थित होते.
यावेळी संजय पडते म्हणाले, राणेंनी यापूर्वी शिवसेना औषधालाही शिल्लक ठेवणार नाही, अशी घोषणा केली होती. मात्र शिवसेना आज मोठ्या प्रमाणात फोफावत आहे. कार्यकर्त्यांना थांबवून ठेवण्यासाठी ते टीका करीत आहेत. यापूर्वी त्यांनी आमचे सरकार एक वर्षात पडणार असल्याची घोषणा केली होती. मात्र आमचे सरकार आता एक वर्ष टिकले आहे. आता त्यांनी पुढील तारीख जाहीर करावी, असा टोलाही त्यांनी राणे यांना लगावला.
सतीश सावंत म्हणाले, राणेंना जनतेने यापूर्वी चार वेळा हद्दपार केले. आता २०२४ साली त्यांना पुन्हा हद्दपार करू, जर त्यांना अधिकच घाई असेल तर नितेश राणे यांना राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढविण्यास सांगावे. आम्ही त्यांचा पराभव करून पुन्हा हद्दपार करून दाखवू, असे आवाहनही त्यांनी राणे यांना दिले.
टिका करण्यापलीकडे त्यांनी काहीच केले नाही व त्यांचा हा टीका करण्याचा स्वभाव आमदार नितेश राणेही अंमलात आणीत असल्याचाही टोला त्यांनी लगावला. राणे यांनी त्यांचा स्वाभिमान पक्ष एका वर्षात विसर्जित केला. कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगले काम करीत असताना राणे एकेरी नाव घेऊन त्यांच्यावर टीका करतात. रक्ताळलेला हात सांगत काँग्रेस पक्ष संपवण्याचे कामही त्यांनी त्यावेळी करण