खा.नारायण राणेंनी शिवसेनची स्पर्धा करू नये विनायक राऊतांचा हल्लाबोल..

खा.नारायण राणेंनी शिवसेनची स्पर्धा करू नये विनायक राऊतांचा हल्लाबोल..

सिंधुदुर्ग /-

शिवसेनेला कोकणातून हद्दपार करण्याची भाषा करणारे भाजप खासदार नारायण राणे यांना विनायक राऊत यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.स्वतःचा पक्ष एका वर्षाच्या आत बरखास्त करण्याची वेळ ओढावलेल्या नारायण राणे यांनी शिवसेनेला घरी बसवण्याची स्वप्न बघू नयेत, असा टोला विनायक राऊत यांनी लगावला.नारायण राणे यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकारपरिषदेत आगामी निवडणुकीत शिवसेनेला कोकणातून हद्दपार करणार, अशी गर्जना केली होती. सध्या कोकणात शिवसेनेचे 11 आमदार आहेत. पुढच्या निवडणुकीत या सर्व आमदारांना घरी बसवण्यात येईल, असे नारायण राणे यांनी म्हटले होते. त्यांच्या या टीकेला शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आले. शिवसेनेला विसर्जित करण्याच्या ‘डराव डराव’च्या घोषणा यापूर्वी अनेकेवळा देण्यात आल्या. मात्र, ते शक्य झाले नाही.मुळात नारायण राणे यांनी असं स्वप्नचं पाहू नये. कारण, शिवसेनेशी स्पर्धा करण्याचे नारायण राणे यांचे दिवस कधीच निघून गेले आहेत, असे विनायक राऊत यांनी म्हटले आहे.

अभिप्राय द्या..