कोल्हापूर /-

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर ऐवजी पुण्यातील कोथरुडमधून निवडणूक लढली. मात्र, तो विषय त्यांच्यासाठी नेहमीच अडचणीचा ठरला आहे. विरोधकांकडून या मुद्द्यावर चंद्रकांत पाटलांना सातत्याने टोमणे मारले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता चंद्रकांत पाटलांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलंय. मी आजही कोल्हापूरमधून निवडणूक लढवायला तयार आहे. जर कोल्हापुरातून निवडून आलो नाही, तर हिमालयात जाईन, असं मत चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केलं आहे. ते पुण्यात वर्षपूर्ती कार्य अहवालाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते.
यावेळी त्यांनी राज्यपाल नियुक्त आमदारांच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेल्या दाव्यावरही टीका केली. “हसन मुश्रीफ यांचे आरोप हास्यास्पद आहे. हा राज्यपालांचा अवमान करण्याचा प्रकार असून लोकशाहीला घातक आहे. विनय कोरे यांच्या आईचं निधन झालंय. मी त्याठिकाणी त्यांच्या कुटुंबाच्या सांत्त्वनासाठी गेलो होतो. अशाठिकाणी मी कसं असं बोलेन?” असं मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं.

हसन मुश्रीफांचा दावा म्हणजे गावगप्पा” राष्ट्रवादीच्या दाव्यावर भाजपचा पलटवार
दरम्यान, हसन मुश्रीफांचा राज्यपाल नियुक्त आमदारांवरील आरोप भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी फेटाळून लावला आहे. ते म्हणाले, “हसन मुश्रीफांचा हा दावा पू्र्णपणे खोटा आहे. त्यांच्या या गावगप्पा आहेत. ग्रामविकास मंत्रीपदावर असणाऱ्या जबाबदार व्यक्तीने असं बोलू नये. मात्र, जे काम आपल्याला झेपत नाही त्याबद्दल अपप्रचार करण्याची राष्ट्रवादीची पद्धतच आहे.”
तसेच, मुश्रीफांचा आरोप फेटाळून लावताना प्रस्तावित आमदारांची यादी मंजूर होऊ नये ही शरद पवारांचीच योजना असू शकते, असा पलटवारही त्यांनी राष्ट्रवादीवर केला. “शरद पवार यांचं राजकारण खुद्द पवार सोडून बाकी कोणालाच माहीत नसतं. त्यामुळे आमदारांची ही यादी मंजूर होऊ नये, अशी योजना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही असू शकते.” असा दावाही त्यांनी केला.

कोल्हापूर जिल्हा भाजपमूक्त आसताना त्यांनी कोल्हापूरातून निवङणूक लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले. पण त्यांनी कोणत्या मतदार संघातून निवङणूक लढविणार हे सांगितले नाही. त्यांनी आपल्या राधानगरी भूदरगङ’आजरा मतदार संघातून निवङणूक लढविल्यास त्यांचे ङिपाॅझिट जप्त होणार अशी चर्चा मतदार संघातून होत आहे. तर दक्षिण मतदार संघात महाङीक परिवारांचा बळी देवून ते निवङणूक लढवतील अशी एक शक्यता आहे.पण मंत्री बंटी पाटील यांच्या समोर त्यानां 1000 हजार मतदान पङणार नाही असे जाणकारांचे मत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page