सावंतवाडी /-
तालुक्यातील शेतपंप प्रकरणे २०१८ रोजी मंजूर झाली आहेत. या प्रकरणी २०११ मध्ये शेतकऱ्यांनी पैसे डिपॉझिट केली आहेत. ही प्रकरण आमदार दिपक केसरकर हे पालकमंत्री असताना मंजूर करण्यात आली होते.
परंतु २०२० मध्ये याचे काम सुरू करण्याच्या वेळीच लॉक डाऊन झाल्याने संबंधित कामाला स्थगिती मिळाली होती. परंतु आता जिल्ह्यातील इतर तालुक्यात सदर कामे सुरू करण्यात आली असून सावंतवाडी तालुक्यात संबंधित ठेकेदार यांनी काम सुरू केले नसल्याने आज रुपेश राऊळ यांनी शेतपंप ची कामे चार दिवसात सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे.