कुडाळ /-

जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजित देसाई व पदाधिकार्‍यांनी कुडाळ पोलिस निरीक्षकांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यामध्ये पंचायत समिती सदस्या नीलिमा वालावलकर व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज रोजी दिलेल्या तक्रारी बाबत लेखी खुलासा देखील केला. तसेच सौ.वालावलकर व त्यांच्या कुटुंबियांना पोलिस संरक्षण देण्याची मागणी देखील केली. आवश्यकता असल्यास सदर संरक्षणाचा सर्व खर्च देण्याची तयारी देखील त्यांनी दर्शवली. यावेळी तालुका अध्यक्ष विनायक राणे, भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी संजय वेंगुर्लेकर, अॅडवोकेट विवेक मांडकुलकर, नगरसेवक सुनील बांदेकर, शहराध्यक्ष राकेश कांदे,पप्प्या तवटे, दादा साईल, देवेंद्र सामंत, अजय आकेरकर, सतीश माडये, सदा अणावकर व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page