मुंबई /-
विद्यार्थ्यांच्या हितासाठीच सरकारने अकरावीच्या आँनलाईन वर्गाला सुरुवात केली आहे. घरात राहूनच आरोग्याबरोबर शिक्षण प्रक्रिया सुरू झाली आहे यामुळेच विद्यार्थ्यांना फार मोठा दिलासा मिळाला आहे असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी केले आहे.
महाराष्ट्रातील अठरा लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. यातील अंदाजे अकरा लाख विद्यार्थ्यांनी अकरावीच्या वर्गासाठी काँलेज मध्ये प्रवेश घेतला आहे. कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे सर्वच यंत्रणा ठप्प झाल्या व प्रवेश प्रक्रिया रखडली असतानाच मराठा आरक्षणाचा प्रश्न कायद्याच्या चौकटीत सापडला यामुळे अकरावी प्रवेश प्रक्रियेला विलंब होत आहे.
शाळा बंद असल्यातरी शिक्षण चालू आहे तसेच काँलेज प्रवेश झाला नसला तरी अकरावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी व त्यांच्या शैक्षणिक वर्षाला सुरूवात करण्यासाठी आँनलाईन वर्ग सुरू करण्यात आले आहेत. शासनाच्या शिक्षण विभागाने आँनलाईन प्रक्रियेचा पहिला टप्पा पार पाडला व आँफलाइन मध्ये सुद्धा अंदाजे अकरा लाख विद्यार्थ्यांचे प्रवेश पुर्ण केले आहेत. अद्याप सात लाख विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रलंबित आहेत. यासाठी कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील सर्वच विद्यार्थ्यांना अकरावी विशेष मार्गदर्शन तज्ञ शिक्षकांमार्फे सुरू करण्यात आले आहे. लवकरच यातून मार्ग काढण्यासाठी सरकार प्रयत्न करेल. कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही याची काळजी आम्ही घेऊ असा विश्वास शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी खाजगी वृत्त वाहिन्यांनी बोलताना व्यक्त केला.
अकरावी प्रवेश संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्याशी संपर्क साधला होता असेही त्यांनी सांगितले. कायदेतज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली व कायद्याच्या चौकटीत राहूनच माननीय मुख्यमंत्री उध्दव साहेब ठाकरे विद्यार्थी हिताचा निर्णय न्यायालयीन प्रक्रियेचा मान राखून लवकरच घेतील असे शिक्षण मंत्री महोदयांनी राज ठाकरे यांना सांगितले.