सावंतवाडी /-
सावंतवाडी तालुक्यातील चौकुळ गावामध्ये तसेच अन्य ठिकाणी वन्यप्राणी कडून शेतकऱ्यांनवर होणारे हल्ले व नुकसान भरपाई मिळण्यासाठी उपवनसंरक्षक वनविभाग,सावंतवाडी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सावंतवाडी यांच्या कडून निवेदन देण्यात आले.
या निवेदनात मनसेच्या वतीने असे सांगितले की, मागील तीन महिन्यातील चौकुळ येथे अस्वल या वन्यप्राणी हमा केल्याची ही सलग लिसरी घटना आते त्यामूळे माणसांवर हल्ला करणारे ठे अस्वल पुकच आहे. याबाबत् आपण व्या ठिकाणी असणारे वनपाल यांना तात्काळ आदेश देऊन त्याचा बंदोबस्त करून व्याला नैसगिक आधिदासात् सोडावे व गेळेत जखमी झालेल्या शेतक-यांना आर्थिक मदत करावी, भातशेती पीक असून कापणी सूरु असून असे जर वन्यप्राणी शेतकन्यांवर असे हल्ले करीत असतील तर तातडीने उपाययोजना करून गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. तरच येथील शेतक-यांच्या शेतीचे वन्यप्राणीपासून संरक्षण होऊ शकते.
तसेच मगरींचा वावर सर्रास मोठ्या प्रमाणात् असून नदीतून बाहेर येऊन तसेव तिलारी कालव्यामध्ये त्याचे वास्तव् आहे. सदर घटनेची तातकाळ दखल घेऊन योग्य त्या उपाययोजना कराव्यात. विषय संवेदनारील आहे. आणि वनविभग संवेदनशीलपणे हा विषय हाताळेल त्याची आम्हाला खात्री आहे.
यावेळी उपस्थित माजी जिल्हा उपाध्यक्ष अनिल केसरकर तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे शहराध्यक्ष आशिष सुभेदार कार्याध्यक्ष संतोष भैरवकर तालुका सचिव विठ्ठल गावडे तालुका उपाध्यक्ष सुधीर राऊळ प्रकाश साटेलकर चौकुळ विभाग अध्यक्ष गौरेश गावडे मनविसे तालुकाध्यक्ष ओमकार कुडतरकर शहर उपाध्यक्ष शुभम सावंत देवेंद्र कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते.