कोल्हापुर /-
महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावात येण्याचे आव्हान देण्याचा खुळचटपणा करणाऱ्या कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी याचा आज सर्वच स्तरातुन निषेध झाला.शिवसैनिकांनी तर कर्नाटकाच्या सीमेवर व नाकासमोर टिच्चून सवदी यांच्या पुतळ्याचे दहन केले वर कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ ही घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते.👉मराठी भाषिक सिमाबांधवाकडून दरवर्षी 1 नोव्हेंबर रोजी पाळण्यात येणारा काळा दिन आणि त्याला महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाने काळी फित लावून काम करण्याच्या केलेल्या समर्थनार्थ पोटशूळ उठलेल्या लक्ष्मण सवदी यांनी मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळुन,जाणीवपूर्वक डिवचण्याचा प्रयत्न केला होता.*
*महाराष्ट्रातील नेत्यांनी मुंबईत बसून बोलण्यापेक्षा बेळगावात यावे असे खुले आव्हान दिले होते.सवदी यांचे हे आव्हान स्वीकारत,जिल्हाप्रमुख संजय पवार आणि विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी आज दुपारी थेट सीमा भागातच घुसण्याचा प्रयत्न केला. पण कागल चेकपोस्ट नाक्याजवळ सीमारेषेवर प्रचंड कानडी फौज फाटा तैनात करून, शिवसैनिकांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. तरीसुद्धा शिवसैनिकांनी कर्नाटकच्या नाकावर टिच्चून, सवदी यांच्या पुतळ्याचे जाहीर दहन करून तीव्र निषेध व्यक्त केला.यावेळी बेळगाव,निपाणी,बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे.., शिवसेना जिंदाबाद,शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जयघोषाने शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला होता.*
पोलिस अधिकाऱ्याचा उर्मटपणा
*महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्या कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांचा पुतळा दहन करणा-या शिवसैनिकांना पोलिस अधिकारी नाळे यांनी नाहक अटकाव करण्याचा प्रयत्न केला. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कसलीही वाहतूक खोळंबलेली नसतानाही नाळे यांनी जिल्हाप्रमुखांशी उद्धट वर्तन केले यासंदर्भात जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे नाळे यांच्याविरोधात तक्रार करणार असल्याचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी सांगितले.दरम्यान इतर पोलिस अधिकाऱ्यांनी याबाबत दिलगिरी व्यक्त करुन वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.