वेंगुर्ला /-

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, सिंधुदुर्ग च्या वतीने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये “गाव तिथे युथ.. युथ तिथे बूथ..” संकल्पना राबविण्यात येत आहे.
यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक बूथ मध्ये बूथ रचना करण्यात येणार आहे. 25ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर पर्यंत बुथ रचना पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. त्यासाठी युवा मोर्चा सिंधूदुर्गच्या वतीने विधानसभा निरीक्षक आणि मंडल निहाय बूथ रचना करण्यासाठी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष दोडामार्ग उपनगराध्यक्ष वेंगुर्ले प्रभारी- श्री. चेतन चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली वेंगुर्ले पक्ष कार्यालयात सभा संपन्न झाली. यावेळी जिल्हा सरचिटणीस बाळू देसाई वेंगुर्ले तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रसाद पाटकर*जि.का.स. साईप्रसाद नाईक दादा केळूसकर युवा सरचिटणीस कुंब्रल सरपंच देवेंद्र शेटकर युवा सरचिटणीस हितेश धुरी चिटणीस तुषार साळगावकर चिटणीस संदिप पाटील चिटणीस हेमंत गावडे चिटणीस भूषण आंगचेकर युवा शहराध्यक्ष प्रणव वायंगणकर संकेत धुरी दशरथ गडेकर अमेय धुरी अमित दाभोलकर हर्षद साळगांवकर नारायण कुंभार साई भोई चंदकांत म्हापणकर भुवनेश परब सौरभ नागोळकर राजाराम कांबळी राहूल मोरडेकर कृष्णा करंगुटकर देवेंद्र राऊळ सोमा सावंत केशव नवाथे यासह युवा मोर्चा चे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page