चौकुळ चिखलव्हाळ येथे पुन्हा अस्वलाचा शेतकऱ्यावर हल्ला.;

चौकुळ चिखलव्हाळ येथे पुन्हा अस्वलाचा शेतकऱ्यावर हल्ला.;

सलग 2 दिवसात झालेल्या हल्ल्याने ग्रामस्थांनमद्धे भीतीचे वातावरण

आंबोली /-

चौकुळ चिखलव्हाळ येथे अस्वलाने शेतकऱ्यावर हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास आणखी एका शेतकऱ्यावर अस्वलाने हल्ला चढविला. बुधाजी नाईक (४२) असे या शेतकऱ्याचे नाव असून जखमी शेतकऱ्याला रुग्णालयात आणण्यासाठी १०८ रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले असून त्याला उपचारार्थ आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात येणार आहे. मागील तीन महिन्यातील अस्वलाने हल्ला केल्याची ही सलग तिसरी घटना आहे. तीन महिन्यांपूर्वी एका महिलेवर अस्वलाने हल्ला केला होता तर गतवर्षीही एका व्यक्तीवर अस्वलाने हल्ला केल्याची घटना घडली होती. त्यामुळे माणसावर हल्ला करणारे हे अस्वल एकच आहे का याबाबत आता ग्रामस्थांमधून भीती व्यक्त होऊ लागली आहे.

अभिप्राय द्या..