‘पंकजा मुंडेना अशी ऑफर फक्त उद्धव ठाकरेंचं देऊ शकतात

‘पंकजा मुंडेना अशी ऑफर फक्त उद्धव ठाकरेंचं देऊ शकतात

पुणे /-

भाजपाचे दिग्गज नेते एकनाथ खडसे यांनी गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. खडसें यांच्यानंतर आता पंकजा मुंडे भाजपा सोडणार असल्याच्या राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. त्याच पार्शवभूमीवर पंकजा मुंडे यांना शिवसेनेकडून ऑफर देण्यात येत आहेत, असा प्रश्न शिवसेना खासदार संजय राऊत यांना पुण्यात विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी सूचक वक्तव्य केले.मला पंकजा मुंडेंविषयी फार माहिती नाही. आमच्याकडून कोणी अशी ऑफर दिली नाही. त्यांना अशाप्रकारची ऑफर फक्त उद्धव ठाकरेचं देऊ शकतात, असं सूचक वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. पुण्यात श्रमिक पत्रकार संघाने आयोजित केलेल्या वार्तालापाला संबोधित करताना संजय राऊत यांनी आज तुफान फटकेबाजी केली.यावेळी बोलताना संजय राऊत यांमी आपल्या शैलीत उत्तरे दिली.

यावेळी पत्रकारांनी पंकजा मुंडे यांच्या शिवसेना प्रवेशावर प्रश्न विचारला. यावेळी बोलतानासंजय राऊत म्हणाले की, ‘पंकजा मुंडे या भाजपच्या चांगल्या नेत्या आहेत. त्यांच्याशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे यांना जर पक्षात घ्यायचे असेल तर त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑफर देतील.’
पंकजा मुंडे या काही महिन्यांपासून भाजपावर नाराज आहेत. त्यामुळे त्यांनी पक्षापासून काहीसा दूरावा साधला होता. विधान परिषदेवर डावण्यात आल्यानंही त्यांची नाराजी दिसून आली होती. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांची पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत वर्णी लागली आहे.

अभिप्राय द्या..