मालवण /-
येथील स्वराज्य महिला सामाजिक सांस्कृतिक आणि सेवते प्रतिष्ठानच्यावतीने पालिकेच्या स्वच्छता विभागाचे मुकादम रमेश कोकरे यांचा सेवनिवृत्तीपर त्यांच्या चांगल्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे.या सत्कार समारंभ दरम्यान संस्थेच्या अध्यक्षा शिल्पा खोत, पालिकेचे बांधकाम सभापती यतीन खोत, सचिव प्रतिभा चव्हाण, खजिनदार चारुशीला आढाव, सहसचिव दीपा पवार, प्रणाली गायकवाड, स्मिता लंगोटे, रूपा कुडाळकर, सायली कांबळी, साक्षी मयेकर, सुवर्णा चव्हाण, आर्या गावकर, स्वाती तांडेल, शांती तोंडवळकर, दिया पवार, मेघा शेलटकर, श्रुती धुरी, चित्रा सांडव यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.