कुडाळ /-
सिंधूदूर्ग जिल्ह्य़ात नॅशनल हायवेहायवेचे काम सुरू आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून भूसंपादन प्रकिया राबविण्यात आली. पण ही भूसंपादन करताना अनेक भ्रष्ट प्रकार आता समोर यायला सुरुवात झाली आहे.
यातील एक बहुचर्चित प्रकरण म्हणजे कुडाळ सांगिर्डे येथील कथीत इमारत क्रमांक ४०५६. ही इमारत कुडाळ नगरपंचायत दफ्तरी असेसमेंटला पञाशेड म्हणून मांगीलाल परमार यांच्या नावे नोंद आहे. तीची लांबी ७० फूट व रूंदी ४० फूट अशी आहे.
_*4056 इमारत निर्लेखीत न करण्याचा नगरपंचायतीचा निर्णय स्वागतार्ह.*_
कुडाळ नगरपंचायतीने प्रांत यांच्या निर्लेखीत करण्याच्या निर्देशानुसार इमारत क्रमांक 4056 चा फेर सर्वेक्षण केल्याने सत्य समोर आले.असून 4056 ही इमारत नसून पञा शेड असल्याचे पहाणीत निदर्शनास आले आहे.त्यानुसार नगरपंचायतीने 4056 ही पञाशेड प्रांताच्या निर्देशानुसार निर्लेखित करता येणार नाही.अशी भूमिका कुडाळ नगरपंचायत प्रशासनाने घेतली आहे.नगरपंचायतीच्या या भूमिकेमुळे मांगीलाल परमार यांची 4056 या कथित इमारतीची मूल्यांकन प्रक्रिया ही बोगस असल्याचे सत्य समोर आले आहे.त्यामुळे नॅशनल हायवेच्या क्रमाक्र 66 च्या संपादन प्रक्रिया ही पूर्णपणे संशयास्पद असून कोट्यावधी रूपयांच्या जनतेच्या कररूपी पैशांचा भ्रष्टाचार यामध्ये झालेला असुन. या संपादन प्रक्रियेत समावेश असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून बोगस प्रकरणातील वितरीत केलेली रक्कम त्वरित वसूल करावी.अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलनात्मक भूमिका लवकरच जाहीर करेल.
सदर पञाशेडचा नॅशनल हायवेच्या संपादित प्रकियेत काही ही संबंध नसताना.(व प्रत्यक्षात ही पञाशेड सद्यस्थितीत जागेवर जैसे थे असताना )बनावट पक्की इमारत ४०५६ क्रमांकाची दर्शवून सुमारे पन्नास लाख रुपयांचे खोटे मूल्यांकन दाखवून शासनाच्या निधीचा अपहार केलेला आहे.ही वस्तुस्थिती कुडाळ प्रांत यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. माञ प्रांत कार्यालया कडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. तसेच प्रांत यांच्या समोरच सांगिर्डे येथे प्रत्यक्षदर्शी ग्रामस्थांनी तिथे इमारतच नसल्याची पंचयादी केलेली आहे.
सांगिर्डे प्रमाणेच फक्त टेस्टिंगसाठी कुडाळ ते झाराप झिरो पाँईट पर्यंतच्या संपादन प्रक्रियेची स्वतंत्र खातेनिहाय चौकशी समिती नेमून चौकशी केली तर यामध्ये कोट्यावधी रुपयांचा महाभ्रष्टाचार समोर येईल.
याबाबत दि. २९ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भास्कर परब ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कनयाळकर यांनी कुडाळचे प्रांत वंदना खरमाळे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन व त्यासोबत इमारत क्रमांक 4056 चे पुरावे देऊन संबंधितावर कारवाई करण्याची मागणी केली.त्यानुसार या संपादन प्रक्रियेत समावेश असलेल्यांना तात्काळ नोटीसा बजावणी करण्याची प्रक्रिया सुरू करून चौकशी करण्यात येईल. असे प्रांत यांनी स्पष्ट केले.