वेंगुर्ला /-
महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री (महसुल,ग्रामविकास,बंदरे,खार जमिनी,विशेष सहाय्य) अब्दुल सत्तार १ नोव्हेंबर २०२० रोजी वेंगुर्ले दौऱ्यावर येत आहेत.यानुसार दुपारी १ वाजता सागर विश्राम गृह वेंगुर्ले भेट, दुपारी २ वा.
पंचायत समिती वेंगुर्ले नविन प्रशासकिय इमारत बांधकाम पाहणी, दुपारी २.३० वाजता प्रादेशिक फळ सशोधन केंद्र वेंगुर्ले येथे उप विभागीय अधिकारी,तहसिलदार, महसुल अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत
महसुल विभागाचा आढावा, नुकसानग्रस्त शेतक-यांची माहिती, दुपारी ३ वा. प्रादेशिक फळ सशोधन केंद्र वेंगुर्ले येथे ग्रामविकास विभागाचा आढावा, ग्रामविकास विभागा मार्फत राबविल्या जाणा-या विविध विकास कामांचा आढावा,
दुपारी ४ वा. उभादांडा नवाबाग फीशरींग व्हीलेज ला भेट व पाहणी,
सायंकाळी ५ वा. रेडी पोर्ट ला भेट व पाहणी, सायंकाळी ५.३० वा. आरोंदा ता.सावंतवाडी जेटी भेट व पाहणी असा त्यांचा वेंगुर्ले दौरा कार्यक्रम बाबत वेंगुर्ले पं. स.सभापती अनुश्री कांबळी व पं. स.सदस्य यशवंत उर्फ बाळु परब यांनी माहिती दिली.