मसुरे /-
आदर्श शिक्षक चंद्रकांत सावंत यांनी मसुरे देऊळवाडा येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या दोन विद्यार्थिनी सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना अंतर्गत दत्तक घेतल्या आहेत. मूळ आंबोली गावचे आणि जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वेंगुर्ले मठ नंबर दोन येथे पदवीधर शिक्षक म्हणून सेवा बजावणाऱ्या चंद्रकांत तुकाराम सावंत यांनी आतापर्यंत शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक प्रशांत पारकर यांच्याकडे चंद्रकांत सावंत यांनी सहा हजारची रक्कम जमा जमा केली. यावेळी देऊळवाडा सरपंच सौ आदिती मेस्त्री यांच्याहस्ते चंद्रकांत सावंत यांचा सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक प्रशांत पारकर यांनी चंद्रकांत सामंत यांच्या कार्याचा गौरव केला. विठ्ठल लाकम यांनी चंद्रकांत सावंत यांचा गौरव करताना त्यांचा आदर्श सर्वानी घ्यावा व शिक्षण क्षेत्रातील हे एक पवित्र असे मोठे कार्य असल्याचा उल्लेख केला. यावेळी मुख्याध्यापक प्रशांत पारकर, शाळा समिती उपाध्य क्ष प्रशांत भोगले, विठ्ठल लाकम, विलास मेस्त्री, सोनोपंत बागवे संतोष अपराज, संतोष परब, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.