सावंतवाडी /-
सिंधुदुर्गातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताच्या संख्येत वारंवार वाढ होत आहे. खड्ड्यातून मार्ग काढताना वाहनचालकांसह नागरिकांना होणारा त्रास यावर लक्ष वेधण्यासाठी मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी जिल्ह्यातील आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत उपविभागीय अभियंता यांची भेट घेतली. यावेळी रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यासंदर्भात चर्चा करत रस्ते दुरुस्त करण्याची मागणी केली आहे.
*अवैध धंदे रोखा*
जिल्ह्यात सद्यस्थितीत अवैध दारू वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. यासंदर्भात उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.रोहिणी सोळंके यांची देखील भेट घेत होणारी अवैध दारू वाहतूक तसेच जुगार अड्डे यांच्यावर योग्य कारवाई करावी आणि तालुक्यात होणाऱ्या अमलीपदार्थांची मोठ्या प्रमाणातील विक्री या संदर्भात योग्य कारवाई करावी अशी मागणी केली आहे. यावेळी परशुराम उपरकर यांचा सोबत मनसेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.