मसुरे /-
कोरोना महामारी मुळे संपूर्ण जग संकटात आहे अशा स्थितीत देशातील सर्व शाळा१६ मार्च २०२०पासून पूर्णपणे बंद आहेत. शाळा सुरू करण्यासंदर्भात अजून शासन निर्णय व्हायचा आहे . सध्यस्थितीत शाळेतील काही मुलांचे शिक्षण विविध शैक्षणिक अॅप,व्हाट स् अॅप. व प्रत्यक्ष फोनद्वारे जूनपासून सुरु आहे परंतु सर्वच ठिकाणी इंटरनेट सुविधा व पालकांकडे एन्ड्राइड फोन नसल्याने १o० टक्के विद्यार्थी शिक्षण प्रवाहात येत नाहीत. ते प्रवाहात यावेत यासाठी मसुरे देऊळवाडा येथील श्री विदयानंद परब यांच्या बंद घरी शाळाबाहेरील शाळा हा उपक्रम पालकांच्या सहकार्यातून राबविण्यात येत आहे .
जिप पूर्ण प्राथमिक शाळा मसुरे देऊळवाडा या शोळतील इयता१ली ते ७वीतील सर्व विधार्थी यात सहभागी होत आहेत . यासाठी शाळा व्यवस्थापन सर्व सदस्य व पालक यांची संमती व सहमती घेऊन व कोवीड१९बाबतचे सर्व नियम पाळून उपक्रम चालू आहे . वरील उपक्रम आठवड्याचे सहा दिवस चालू आहे . दररोज तीन तास सर्व शिक्षक मार्गदर्शन करतात . यामध्ये सोमवार , गुरुवार , शनिवार इ .१ली ते४थी . मंगळवार बुधवार शुक्रवार इ .५वी ते ७वी .तसेच जून महिन्यापासून प्रत्येक विद्याथ्र्याला सर्व विषयांचे छापील स्वाध्याय देऊन ते व्हॉट स् अॅप व फोन या माध्यमाद्वारे सोडवून घेतले जात आहेत . या सर्व उपक्रमांसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री .प्रशांत पारकर,शिक्षक श्री . सचिन डोळस,श्रीम. स्वाती कोपरकर , श्रीम. कविता सापळे. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री . निलेश लाड. उपाध्यक्ष श्री. प्रशांत भोगले व सर्व सदस्य, पालक हे परिश्रम घेत आहेत.