▪️देशातील कोरोना बाधीतांच्या संख्येने ओलांडला ७८ लाखांचा टप्पा. आत्तापर्यंत ७८ लाख ६४ हजार ८११ जणांना बाधा.

▪️गेल्या २४ तासात देशात ५० हजार १२९ नव्या रुग्णांची नोंद तर ५७८ जणांचा मृत्यू.

▪️रुग्णसंख्या वाढत असली तरी दिलासादायक बाब म्हणजे आत्तापर्यंत ७० लाख कोरोनाबाधित रुग्ण बरे होवून घरि परतले आहेत.

▪️देशात आत्तापर्यंत १ लाख १८ हजार ५३४ जणांचा बळी तर ६ लाख ६८ हजार १५४ ॲक्टिव्ह केसेस.

▪️कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी स्पेनमधे आणीबाणी घोषित. रात्रीच्या वेळी लागु केला कर्फ्यू.

▪️रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास हे कोरोना संक्रमित झाले आहेत. प्रकृती उत्तम असल्याचे केले ट्विट.

▪️राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची बाधा. उपचारासाठी ब्रिच कॅंडी रुग्णालयात दाखल.

▪️मुख्यमंत्र्यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या टिकेनंतर खा. नारायण राणे, आ. नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे आक्रमक. बोचऱ्या शब्दात केली ठाकरे यांच्यावर टिका.

▪️राज्यातील १८ हजार सहकारी पतसंस्थाना राज्य सरकारचा दिलासा. ऑडिट वर्गाच्या गुणांमधे सरसकट १० टक्क्यांची आणली शिथिलता.

▪️दसरा मेळाव्यात उध्दव ठाकरेंनी केलेल्या टिकेनंतर अभिनेत्री कंगना राणौत आक्रमक. उध्दव ठाकरे नेपोटिझम प्रॉडक्ट असल्याचा केला हल्लाबोल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page